Life is more....be positive
Thursday, 9 June 2016
Friday, 3 June 2016
Bhavishya
प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पांडित्य भूषण हेमंत आठल्ये यांचा नमस्कार. गेल्या अनेक दिवसांपासून नित्यनियमाने ‘राशी आणि स्वभाव’ या नोंदीवर अनेक जण आपले भविष्य जाणून घेण्यासाठी आतुरलेले आहेत. म्हणून आज सोमवार फाल्गुन शुक्लं ९ शके १९३२ रोजीच्या शुभमुहूर्तावर बोलावं म्हणतो. ज्यांचा जन्म १९५० ते १९८५या काळात झालाय त्यांना बालपण उत्तम जाईल. तारुण्यात आणि म्हातारपणी त्यांना त्रास संभवतो. ज्यांचा जन्म १९८५ सालानंतर झाला आहे, त्यांना मनमोहन योगामुळे त्रास संभवतो. देशाचेही जवळपास असेच भविष्य आहे.
गेल्या सात वर्षांपासून मनमोहन योगामुळे सर्वच ठिकाणी भाववाढ, नुकसान आणि धोका संभवतो. जीवित आणि वित्तहानी अमाप प्रमाणात होणार. शत्रूपीडा संभवते. एकूणच आर्थिक आणि सामाजिक संतुलन लयास जाईल. हसन योगामुळे वित्तीय तुट कधीही भरून काढणे शक्यच नाही याचा अंदाज येईल. धान्य आणि उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल. परंतु शरद ऋतूच्या आगमनाने धान्य सडवण्याचे योग्य राहील. वाईन, दारू यांसारखे उद्योगांना मोठी चलती आहे. राहुल योगामुळे वयाची चाळीशी गाठली तरी तारुण्य अजून शिल्लक आहे, अस वातावरण राहील. स्त्री वर्ग सरकारी कागदोपत्री सुधारित आणि विकसित होत असल्याचे चित्र ज्योतिषाचार्य हेमंत आठल्ये यांना वाटते.परंतु सत्यात शीला योगामुळे राजधानीत तरुण मुलींवर होणाऱ्या अत्याचाराने देशाची राजधानी सोबत अत्याचाराचीही राजधानी असा नावलौकीक दिल्ली कमावले. महाराष्ट्रात, आघाडी षडाष्टक असल्याने आदर्श घोटाळे होतील. आणि तरीही लोकात चीड निर्माण होणार नाही.
हे कलियुग आहे, हे सिद्ध करण्यासाठी यूपीएचा जन्म झाल्याचे जाणवेल. कदाचित लोकात ‘कली’चे राज्य काय असते आणि नरकयातना काय असतात याचा याची देही याच डोळा अनुभव येईल. त्यामुळे आपल्याला ‘भविष्य आहे का?’ हा प्रश्न सर्वांच्या मनात नक्कीच